सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (11:44 IST)

नोएडा:भाजी विक्रेत्याची विवस्त्र करून बाजारात धिंड, दोघांना अटक

पैशांसाठी माणूस काहीही करू शकतो. पैशापायी लोक माणुसकी विसरत आहे. माणुसकीला लाजवणारी अशी एक घटना नोएडा मध्ये घडली आहे. भाजी विक्रेत्याने 3000 रुपयांचे कर्ज फेडले नाही म्हणून त्याला मारहाण करून त्याला विवस्त्र करून त्याची बाजारात धिंड काढण्याची लज्जास्पद घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
तरुणाला विवस्त्र केल्यानंतर आरोपी भाजी मंडईत फिरत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आश्चर्य म्हणजे हा त्या दिवसाचा व्हिडिओ आहे. शेकडो लोकांनी हा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला असून त्यावर प्रतिक्रिया देत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. 

पीडित तरुण भाजीविक्रेता आहे. व्हिडीओमध्ये काही लोकांनी भाजी विकणाऱ्या दुकानदाराला त्याच्या दुकानात कुलूप लावले, त्याला विवस्त्र केले, मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. 
सदर घटना फेज -2 च्या सेक्टर 88 ची आहे. पीडित तरुण भाजी मंडईत हातगाडीवर लसूण विकतो.

त्याने सुंदर कडून 5600 रुपये कामासाठी उसने घेतले होते. त्याने त्यापैकी 2500 रुपये परत दिले आणि उर्वरित पैसे नंतर देण्यासाठी म्हटले. एवढ्या वरून आरोपी सुंदर दोन लोकांना घेऊन पीडित तरुणला मारहाण केली नंतर विवस्त्र करून बाजारात त्याची धिंड काढली. आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित तरुणाने पोलिसांत आरोपी सुंदर आणि इतर दोघानाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसानी अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे. 
 


Edited by - Priya Dixit