1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 (08:53 IST)

'मुक्त'चे कोणतेही अभ्यासक्रम रद्द नाहीत

None of the free
मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द झालेले नाहीत, असं स्पष्टीकरण विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या ज्या अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आढळतील, त्या दूर करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी संबंधित विद्यापीठांना देण्यात येतील, असं विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितले आहे. मुक्त विद्यापीठांचे अभ्यासक्रम रद्द झाल्याचं वृत्त प्रसारित होताच यूजीसीकडून  मुक्त विद्यापीठांना पत्र पाठवण्यात आलं. याबद्दलची अधिक माहिती 16 ऑगस्टला यूजीसीच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, असं आवाहनदेखील यूजीसीकडून करण्यात आलं आहे.