शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अहमदाबाद , सोमवार, 9 ऑक्टोबर 2017 (11:35 IST)

गोधरा कांड: गुजरात HCने बदला निर्णय, 11 दोषींना फाशी नसून जन्मठेप

गोधरा हत्याकांड प्रकरणी गुजरात हायकोर्ट आज सकाळी 11 वाजता मोठा निर्णय देण्यात आला आहे. 11 आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली आहे. गुजरातमधील गोधरा स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता.
 
साबरमती ट्रेनच्या एस-6 या बोगीला आग लावल्याप्रकरणी एसआयटीच्या विशेष न्यायालयाने 31 जणांना दोषी ठरवलं होतं, तर 63 जणांना निर्दोष मुक्त केलं. आरोपींपैकी 11 जणांना फाशी, तर 22 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
 
कोर्टाच्या या निर्णयाला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आरोपींना दिलेली शिक्षा कमी आहे, निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी गुजरात सरकारने केली होती. तर आपल्याला अजून न्याय मिळाला नसल्याचं आरोपींनी म्हटलं होतं.
 
गोधरा हत्याकांड प्रकरण काय आहे?
 
गुजरातमधील गोधरा स्टेशनवर 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या.
 
या घटनेच्या चौकशीसाठी गुजरात सरकारने नानावटी आयोगाची स्थापना केली. साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 बोगीत लागलेली आग ही एक घटना नव्हती, तर तो एक कट होता, असं या आयोगाने म्हटलं होतं.