1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. on the day of demonetization

नोटाबंदीच्या दिवशी काय चित्र होते ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली.  त्यादिवशी रिझर्व्ह बँकेची काय स्थिती होती याबाबतची माहिती RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवली आणि त्यांच्या हाती विशेष माहिती लागली आहे. यात खालील गोष्टी समजल्या आहेत. यात एकूण चलनापैकी 86 टक्के चलन नोटबंदीमुळे रद्द झाले होते. प्रत्यक्षात आरबीआयने फक्त नवीन 2000 रुपयांच्या 24732 कोटी नोटांची छपाई केली, ज्याची किंमत 4,94,640 कोटी आहे.
 
नोटबंदीची घोषणा केली, त्यावेळी भारतीय रिजर्व बँकेकडे, 500 रुपयाची एकही नवी नोट नव्हती. नव्या 2000 रुपयांच्या 24 हजार 732 कोटी नोटा ज्याची किंमत 4,94,640 कोटी होती.
 
8 नोव्हेंबर रोजी नोटबंदी केली त्यावेळी आरबीआयकडे 10, 20, 50, 100, 500 आणि 1000 रुपये मूल्यांच्या एकूण चलनाची संख्या 12,42,300.1 कोटी होती. तर त्याची एकूण किंमत 23,93,753.39 कोटी होती.
यात 500 आणि 1000 मूल्यांच्या चलनाची संख्या 3,18,919.2 कोटी होती, ज्याची एकूण किंमत 20,51,166.52 कोटी होती.
पुढील लेख
काळापैशासाठीच्या ईमेल आयडी प्रचंड प्रतिसाद