सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (09:10 IST)

पुन्हा एकदा राज यांच्याकडून व्यंगचित्रातून मोदींवर टीका

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या कुंचल्यांनी पुन्हा एकदा ६८ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना फटकारले आहे. मोदींना राज ठाकरेंनी स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक अशा शब्दांत टोला लगावला आहे. सर्व शाळांमध्ये मुलांना नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित ”चलो जीते है”हा लघुपट दाखवण्याची सक्ती केली आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा दाखला देत राज ठाकरे यांनी मोदींना ओरखडे ओढले आहेत.
 
विशेष म्हणजे त्या गणपतीला मोदी स्वत: ओवाळत आहेत. बाजूला अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह ही नेहमीची मंडळी दिसतात. मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज यांनी हे व्यंगचित्र काढले आहे.