शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (17:28 IST)

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार: विराट,मीराबाई चानू यांची शिफारस

भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहली आणि स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. पुरस्कार खेल रत्न अर्जुन पुरस्कार समितीने या नावांची शिफारस केली आहे. २०१६ सालीही विराट कोहलीच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली होती. 
 
गेल्या काही वर्षात विराट कोहली चांगली कामगिरी करून आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. कोहलीच्या नावाला क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी मंजूरी दिली तर विराट कोहली खेल रत्न पुरस्कार मिळवणारा तिसरा क्रिकेटपटू होईल. तर गेल्या वर्षी वर्ल्ड चँपियनशीप मध्ये ४८ किलो वर्गात सुवर्ण पदकाची कमाई करणार्‍या मीरबाई चानूचे नावाची शिफारसही या पुरस्कारासाठी केली आहे.