'व्होकल फॉर लोकल': 1 जूनपासून निमलष्करी दलाच्या कॅन्टिनमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील
1 जूनपासून केवळ देशी निर्मित वस्तूच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (सीएपीएफ) कॅन्टिनमध्ये विक्री केली जाईल. गृहमंत्रालयाने बुधवारी (13 मे) ही माहिती दिली. गृह मंत्रालयाने सांगितले की, त्यानंतर सुमारे दहा लाख सीएपीएफ जवानांच्या कुटुंबाचे 50 लाख सदस्य स्वदेशी निर्मित उत्पादनांचा वापर करतील.
सीएपीएफ अंतर्गत देशातील निमलष्करी दले सीआरपीएफ, सीआयएसएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि
एसएसबी आहेत. तसेच गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी देशाला दिलेल्या भाषणात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन आणि भारत स्वावलंबी करण्याचे आवाहन केले होते. गृह मंत्रालयाने या दिशेने हे पाऊल उचलले आहे.