नाशिकमध्ये पॅराशूटसह जवान बाभळीच्या झाडावर अडकला
नाशिकमध्ये काल सकाळी नऊच्या सुमारास आर्मीच्या जवानाचं पॅराशूट (Soldier para shoot fall nashik) कोसळलं. बाभळीच्या झाडावर हे पॅराशूट कोसळल्याने जवान काही काळ झाडावरच अडकून पडला होता. मात्र त्याला मनीष काठे या तरुण शेतकऱ्याने सुखरूप बाहेर (Soldier para shoot fall nashik) काढलं.
भाबळीचे काटे अंगावर टोचल्यानं जवानाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही.
दैनंदिन सराव करत असताना तीन पॅराशूट फेल झाले होते. मात्र त्यातील दोन सुखरुप खाली उतरले, तर त्यातील एक बाभळीच्या झाडावर कोसळलं होतं. त्यामुळे जवान बाभळीच्या झाडावरच अडकून पडला.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनस्थळी पोहोचले. त्यानंतर बाभळीचं झाड पाडून जवानाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी आर्मीचे अधिकारी मदतीसाठी तात्काळ दाखल झाले होते.