पहलगाम: दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातात AK-47
पहलगाम दहशतवादी हल्ला: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा पहिला फोटो (Pahalgam Terrorists First Photo) समोर आला आहे. तो पठाणी सूट घातलेला दिसतोय आणि त्याच्या हातात एक अत्याधुनिक शस्त्र (AK-47) आहे आणि गोळीबार करणाच्या अॅक्शनमध्ये आहे. प्रत्यक्षदर्शी आणि पीडितांनी सांगितले की, दोन दहशतवादी लष्कराच्या गणवेशात होते. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांची संख्या ५ पेक्षा जास्त असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी संपूर्ण योजना आखली होती. हल्ल्यानंतर कोणता मार्ग निवडायचा हेही त्यांनी ठरवले होते. मंगळवारी दुपारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यादरम्यान, दहशतवाद्यांनी प्रथम पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र, आता हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. तो पठाणी सूटमध्ये दिसत आहे. या चित्राच्या मदतीने सुरक्षा संस्थांना बरीच मदत मिळू शकते.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे. एनआयएचे पथक श्रीनगरला पोहोचले आहेत आणि फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी उपस्थित आहे. जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे. लष्कराचे जवानही ड्रोनचा वापर करत आहेत. भारतीय लष्कराने आघाडीवर ALH ध्रुव हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. लष्कर त्याचा वापर शोध मोहिमेसाठी करत आहे.
धर्म विचारला, कलमा म्हणायला सांगितले आणि गोळी झाडली
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी प्रथम तिथे उपस्थित असलेल्या लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि नंतर त्यांना कलमा म्हणण्यास सांगितले आणि जेव्हा त्यांनी तो म्हटला नाही तेव्हा त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दहशतवाद्यांनी महिलांसमोर फक्त पुरूषांना गोळ्या घातल्या. दहशतवाद्यांनी विशेषतः हिंदूंना लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी निवडक हिंदूंवर गोळ्या झाडल्या, काहींच्या डोक्यात तर काहींच्या छातीत.
हल्ल्यातील वाचलेल्यांनी सांगितले की हल्लेखोरांनी फक्त पुरुषांना लक्ष्य केले आणि विशेषतः हिंदूंना कलमा म्हणण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. ज्यांना वाचता येत नव्हते त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. महाराष्ट्रातील पुणे येथून पहलगामला भेट देण्यासाठी आलेल्या आसावरीच्या वडिलांना तिच्यासमोर दहशतवाद्यांनी तीन गोळ्या घातल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस पहलगामच्या जंगलात मोठी कारवाई करत आहेत. दहशतवाद्यांच्या या नापाक कृत्यानंतर सुरक्षा दल चोख प्रत्युत्तर देण्याच्या स्थितीत आहेत. पहलगाममधील हल्लेखोर दहशतवाद्याचा हातात एके-४७ असलेला फोटो समोर आला