तीन पाकिस्तानी नागरिकांना अटक, बनावट पासपोर्ट जप्त
बनावट पासपोर्टच्या आधारावर भारतात येऊन वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली दोन महिलांसह तीन पाकिस्तानच्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बंगळुरु येथील कुमारस्वामी लेआऊटमध्ये पोलिसांनी धाड टाकली. यात तीन पाकिस्तानचे नागरिक बनावट पासपोर्टच्या आधारावर राहत होते. त्याच्यांकडून आधार कार्डसह अनेक कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या नागरिकांना मदत केल्याच्या आरोपावरुन एका भारतीय नागरिकाला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. समीरा, काशीफ शमशुदीन आणि किरन गुलाम अली अशी अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांची नावे आहेत. तर मोहम्मद शिहाब असे त्यांना मदत करणा-या भारतीयाचे नाव आहे.