शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (08:46 IST)

पराग अगरवाल: मुंबईत शिकलेले अगरवाल ट्विटरचे नवे CEO

आयआयटी मुंबईमध्ये शिकलेले आणि ट्विटर कंपनीचे चीफ टेक्निकल ऑफिसर (CTO) पराग अगरवाल यांची ट्विटरच्या कार्यकारी प्रमुख पदी (CEO) निवड करण्यात आली आहे.
जॅक डॉर्सी हे गेल्या 16 वर्षांपासून ट्विटरचे सीईओ होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि अगरवाल यांची सीईओ म्हणून निवड केली आहे.
पराग यांनी आभार व्यक्त करणारे पत्र कंपनीला पाठवले आहे. त्यात ते म्हणतात की "मी दहा वर्षांपूर्वी या कंपनीत आलो. अनेक चढउतार पाहिलेत. सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यामुळे मी भारावून गेलो आहे. आपण आपल्या कंपनीची उद्दिष्टे भविष्यातही अशीच गाठत राहू."
सुंदर पिचाई हे गुगलचे सीईओ आहेत, शंतून नारायण हे अडोबचे, सत्या नडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत. आता ट्विटरचे सीईओ भारतीय बनले आहेत.