पतंजली आज लॉन्च करणार कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषध कोरोनिल
कोविड - 19 विषाणूविरोधात प्रभावी औषध आणि लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजली मंगळवारी कोरोनावर आधारित कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं 'कोरोनिल' जगासमोर आणणार आहे.
आचार्य बालकृष्ण आज दुपारी हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध 'कोरोनिल' लॉन्च करणार आहेत. बाबा रामदेवही यावेळी उपस्थित राहणार आहेत.