रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जानेवारी 2020 (10:12 IST)

'प्लास्टिकची अंडी' ही अफवा आहे, हे शक्य नाही

गेल्या काही दिवसांपासून  समाजमाध्यमावर प्लास्टिकची अंडी बाजारात विक्रीस आली असून प्लास्टिकची अंडी पाण्यावर तरंगतात, असे वृत्त प्रसारित केली जात आहे. या अफवेमुळे अंडी उत्पादक पोल्ट्री व्यावसायिकांच्या व्यवसायावर फारसा परिणाम झाला नसला तरी अफवेमुळे पोल्ट्री व्यावसायिकांची अडवूणक होत आहे. या पार्श्वभूमीवर अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय अंडी समन्वय समिती (नॅशनल एग्ज कोर्डिनेशन कमिटी) कडून करण्यात आली आहे.
 
काही वर्षांपूर्वी अशा प्रकारची अफवा ठाणे जिल्ह्य़ात पसरविण्यात आली होती. त्यावेळी अंडी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा अडवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे मदत मागितली होती. प्लास्टिकची अंडी तयार करणे शक्य नाही. ‘एफडीए’कडून अंडय़ांची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्लास्टिकची अंडी अफवा असल्याचे निदर्शनास आले होते स्पष्ट करण्यात आले.