शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (16:30 IST)

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ;या दिवशी येऊ शकतो 12 वा हप्ता

modi farmers
देशभरातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची प्रतीक्षा लवकरच संपू शकते. किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करू शकते. देशभरातील करोडो शेतकरी आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविली जात आहे. आतापर्यंत एकूण 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे 17 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत. त्यांना 12 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. तथापि, पोर्टलवर OTP आधारित ई-केवायसी अजूनही उपलब्ध आहे. 
 
Edited By - Priya Dixit