मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी सर्वांना 2025 नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ते म्हणाले की 2025 च्या सुरुवातीला ग्रामीण भारत महोत्सवाचा हा भव्य कार्यक्रम भारताच्या विकासाच्या प्रवासाची ओळख करून देणारा आणि एक ओळख निर्माण करणारा आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी अभिनंदन करतो. लाखो खेड्यांतील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.#WATCH | Delhi: At Grameen Bharat Mahotsav 2025, Prime Minister Narendra Modi, says "At the beginning of the year 2025, this grand event of Grameen Bharat Mahotsav is introducing India's development journey. It is creating an identity. I congratulate NABARD and other colleagues… pic.twitter.com/F4musOMHvi
— ANI (@ANI) January 4, 2025
आज लोकांना 1.5 लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये आरोग्य सेवेसाठी चांगले पर्याय मिळत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही देशातील सर्वोत्तम डॉक्टर्स आणि रुग्णालये खेड्यापाड्यांशी जोडली आहे. टेलिमेडिसिनचा लाभ घेतला आहे. ग्रामीण भागातील करोडो लोकांनी ई संजीवनीच्या माध्यमातून टेलिमेडिसिनचा लाभ घेतला आहे.#WATCH | Delhi: At Grameen Bharat Mahotsav 2025, Prime Minister Narendra Modi, says "Clean drinking water is reaching every household in lakhs of villages. Today, people are getting better options for health services in more than 1.5 lakh Ayushman Arogya Mandirs. With the help of… pic.twitter.com/U4WvVlWYI8
— ANI (@ANI) January 4, 2025