पीएम मोदी 14 ऑगस्टला रामपूर, शिमला येथील आपत्तीग्रस्त भागाला देऊ शकतात भेट
पीएम मोदी शिमला येथील रामपूर समेज येथील आपत्तीग्रस्त भागाला भेट देऊ शकतात. पीएम मोदी 14 ऑगस्टला शिमल्याला जाऊ शकतात. पण, पंतप्रधान मोदींचा दौरा हवामानावर अवलंबून असेल.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी हिमाचल प्रदेशला भेट देणार होते, परंतु खराब हवामानामुळे हा दौरा रद्द करण्यात आला. हवामान सुधारल्यावर पंतप्रधानांच्या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले जाईल, असे ते म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार हिमाचलमध्ये, 27 जून ते 12 ऑगस्ट दरम्यान पावसा संबंधित घटनांमध्ये 110 लोकांचा मृत्यू झाला तर राज्याचे अंदाजे 1,004 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले होते. हवाई पाहणीत पंतप्रधानांसोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयनही उपस्थित होते. 30 जुलै रोजी येथे झालेल्या भूस्खलनात 226 जणांचा मृत्यू झाला होता.
Edited By- Dhanashri Naik