शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (21:57 IST)

PM मोदींची मोठी घोषणा : मेडिकल कॉलेजच्या फीमध्ये दिलासा

वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील ५० टक्के जागांसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांप्रमाणेच शुल्क आकारले जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले - आम्ही ठरवले आहे की खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील निम्म्या जागांसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणेच शुल्क आकारले जाईल. वास्तविक, अनेक दिवसांपासून देशात वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क कमी करण्याची मागणी होत होती. काही दिवसांपूर्वी शुल्क कपातीचे पाऊल लवकरच उचलले जाऊ शकते, असा अंदाजही व्यक्त केला जात होता.