रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (19:53 IST)

महाराष्ट्रातील तीन महिलांना 'नारी शक्ती पुरस्कार'

womens day
समाजासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील तीन महिलांना राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करतील. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 2020 आणि 2021 साठी नारी शक्ती पुरस्कार जाहीर केला. देशभरातील एकूण 28 महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. कथ्थक नृत्यांगना सायली आगवणे या डाउन सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील तीन महिला आणि 2020 च्या पहिल्या सर्पमित्र महिला विनिता बोराडे आणि 2021 साठी उद्योजक कमल कुंभार यांचा समावेश आहे. 2020 मध्ये कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार प्रदान करण्यात आले नाहीत.