वादानंतर बीएसएफ जवानांनी एकमेकांवर गोळी झाडली,दोघांचा मृत्यू
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये बीएसएफच्या दोन जवानांनी एकमेकांवर गोळीबार केला, या घटनेत दोन्ही जवानांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुर्शिदाबादच्या जलंगी भागात घडली आहे. दोन्ही जवानांमध्ये वाद झाला, त्यानंतर त्यांनी बंदूक उचलली आणि एकमेकांवर गोळीबार केला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बीएसएफच्या जलंगी कॅम्पमध्ये पहाटे ही घटना घडली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोघांना स्थानिक पोलिसांनी बोलावले, त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली.त्यांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला.