बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (16:33 IST)

गाडीत प्रवासी भरल्याच्या वादावरून दोन चालकांमध्ये हाणामारी

सध्या राज्यात एसटीचा संप सुरु असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांना खासगी वाहनाने ये जा करावी लागत आहे. या साठी खासगी वाहने जास्तीचे पैसे घेत आहे खासगी वाहने देखील प्रवाशांनी गच्च भरून निघत आहे. या साठी खासगी वाहन चालकांमध्ये आपापल्या वाहनांमध्ये प्रवाशांना बसविण्यासाठी चढाओढ लागली आहे. हे वाहन चालक आपापल्यापरीने प्रवाशांना आपल्या वाहनांमध्ये बसविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशात यांचा मध्ये कधीतरी वादावादीची स्थिती उद्भवते. पण प्रवाशांना घेऊन दोन खासगी वाहन चालकांमध्ये हाणामारी होणं म्हणजे आश्चर्यच आहे. अशीच घटना घडली आहे औरंगाबादच्या सिडको भागात. येथे सिडको बस स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी वाहने उभे असतात. या वाहनांच्या दोघा चालकांमध्ये प्रवाशांना आपल्या वाहनात बसविण्यावरुन हाणामारी झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या व्हिडीओ मध्ये हे खासगी वाहन चालक एकमेकांना हाणामारी करत शिवीगाळ करत आहे. तिथे जमा झालेल्या लोकांनी त्यांच्यात मध्यस्थी करत त्यांचे भांडण मिटवले.