शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (15:01 IST)

नारायण राणे आणि शिवसेना वाद पेटणार

सध्या भाजप आणि शिवसेनामध्ये वाद वाढत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांचा मुंबईतील अधिश बंगल्यावर बीएमसी कडून कारवाई करण्यात आली. आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण चिवला बीच येथील 'नीलरत्न' बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश भारत सरकारचे पर्यावरण आणि वन मंत्रालय नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला दिले आहे. 

संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांच्या मुंबईतील 'अधिश' बंगल्यावर कारवाई केल्यांनतर आता मालवणच्या 'नीलरत्न ' या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर राणे विरुद्ध शिवसेना हा वाद अजून पेटण्याची संकेत दिसत आहे. अधिश बंगला हा कायदेशीररित्या बांधला गेला असून त्याच्यावर अतिरिक्त बांधकाम केले नाही. ही इमारत 100 टक्के रहिवाशी असून मी माझ्या कुटुंबियांसमवेत राहतो. असे राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.आता नारायण राणे यांच्या मालवणच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश करण्यात आले असून शिवसेना आणि नारायण राणे वाद पेटण्याची शक्यता आहे.