बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 नोव्हेंबर 2018 (08:03 IST)

पाकिस्तान सार्क परिषदेचे निमंत्रण पाठवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानतर्फे सार्क परिषदेचे निमंत्रण पाठवलं जाणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता डॉक्टर मोहम्मद फैसल यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानात सार्क परिषद होणार आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात येईल असं फैसल यांनी स्पष्ट केलं. इम्रान खान यांनी जेव्हा पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा पाकिस्तान भारतापुढे मैत्रीचा हात करेल असे म्हटलं होतं. 
 
१९ व्या सार्क परिषदेचे आयोजन २०१६ मध्येच पाकिस्तानात करण्यात येणार होतं. मात्र भारत, बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी या परिषदेत सहभाग घेण्यास असहमती दर्शवली. त्यानंतर ही परिषदच रद्द करण्यात आली होती. उरी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भारताने या परिषदेला जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानने केलेल्या उरी येथील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं होतं.