पाकमध्ये मारला गेला तालिबानचा गॉडफादर
तालिबानचा 'गॉड फादर' म्हणवला जाणारा मौलाना समी-उल हक हा पाकिस्तानात मारला गेल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडियामधील वृत्तांनुसार, रावळपिंडीत हकची हत्या झाली. पाकिस्तानात हकची एक धार्मिक नेता अशी ओळख होती. तो माजी खासदारही आहे. कट्टरतावादी राजकीय पक्ष जात उलेमा-ए-इस्लाम समीचा प्रमुख होता.
पाकिस्तानी वाहिनी जियो न्यूजने सांगितले की, हक आपल्या गाडीतून जात असताना अज्ञात मोटार-सायकलस्वारांनी त्याच्या दिशेने येऊन अंधाधुंद गोळीबार केला. काही वृत्तांनुसार, हकची हत्या त्याच्या घरात झाली, असे त्याच्या मुलाने सांगितले. जमात उलेमा-ए-इस्लाम समीच्या पेशावरच्या प्रमुखाने स्पष्ट केले की हकची हत्या रावळपिंडीत झाली. गोळीबारानंतर जखमी हकला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. हकचा चालक आणि सुरक्षारक्षकर्मी ही जखमी झाले.