सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काय खरंच मोदींनी 15 लाख महिना पगारावर मेकअप आर्टिस्ट ठेवला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गमतीदार सूट तर तुम्हाला आठवतच असेल. त्यावर त्यांच्या नावाचे पट्टे लिहिले होते. आणि ते एनएम प्रिंट शाल. ज्यामुळे त्यांना खूप टीकाकशी सहन करावी लागली होती. मग ते एक खास प्रकारचे मश्रुम खातात हे ही समोर आले होते, ज्यावर त्याने भरपूर पैसे खर्च केले. आता सोशल मीडियावर बातमी प्रसारित होत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः: ला सजवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात.  
 
हे व्हायरल पोस्ट काय आहे?  
15 लाख रुपये महिना पगारावर ठेवलेल्या मेकअप आर्टिस्टद्वारे मेकअप करवून सजून-धजून बाहेर निघतात पंतप्रधान. सोशल मीडियावर कॅप्शनसह एक चित्र शेअर केले जात आहे. या चित्रात नरेंद्र मोदी खुर्चीवर बसलेले दिसत आहे. तिथे उभे असलेल्या मुलीच्या हातात एक बॉक्स आहे. तिचा दुसरा हात पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्याजवळ आहे. मुलीच्या हाताचा बॉक्स पहिल्या दृष्टिक्षेपात मेकअप बॉक्ससारखा दिसत आहे. आम्हाला हे पोस्ट आदित्य चतुर्वेदी नावाच्या फेसबुक वापरकर्त्याच्या टाइमलाइनवर प्राप्त झाले आहे, जे 16 हजारांहून अधिक लोकांनी शेअर केले आहे. हे पोस्ट, ‘काँग्रेस लाओ देश बचाओ’ नावाच्या फेसबुक पेजवर देखील शेअर केले गेले आहे, आतापर्यंत 4 हजार लोकांनी ते शेअर केले आहे.
सत्य काय आहे?
व्हायरल चित्र शोधताना आम्ही 2016 चा एक व्हिडिओ बघितला, मॅडम तुसाद सिंगापुराने 19 मे, 2016 ला यूट्यूब वर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओ बद्दल लिहिले होते - 'भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीयांची प्रतिमा कशी बनविली हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? तसे असल्यास, हा व्हिडिओ पहा. ' या व्हिडिओमध्ये आम्हाला 0.16 सेकंदावर एक फ्रेम दिसला ते हेच चित्र आहे जे व्हायरल पोस्टमध्ये वापरले गेले आहे. आता आपल्याला देखील समजले असेल की व्हायरल होत असलेले हे चित्र त्यावेळीचे आहे जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याची तयारी करण्यासाठी मॅडम तुसाद सिंगापूरचे लोकं दिल्लीला आले होते. संग्रहालयातील कलाकार आणि एक गट पंतप्रधानांच्या घरापर्यंत पूर्ण मापन, पूर्ण तपशील घेण्यासाठी पोहोचले होते. आमच्या तपासणीत, पंतप्रधान स्वत:च्या मेकअपसाठी 15 लाख रुपये महिना खर्च करत असल्याचा दावा खोटा सिद्ध झाला आहे.