मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (12:53 IST)

'त्या' विडीओसाठी एक रुपया खर्च नाही : पीएमओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस चॅलेंज व्हिडिओवर एक रुपया देखील खर्च करण्यात आलेला नाही, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. या व्हिडिओसंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पीएमओने हे स्पष्टीकरण दिले आहे.
 
जून महिन्यात क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेस चॅलेंज सुरु केले होते. यावेळी मोदींनीही विराट कोहलीने दिलेले चॅलेंज पूर्ण करत स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओवर ३५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप झाला. 
 
यावर मोदींच्या व्हिडिओ संदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवण्यात आली होती. यात पंतप्रधान कार्यालयाने उत्तर दिले आहे. ‘मोदींचा फिटनेस चॅलेंजचा व्हिडिओ हा पंतप्रधानांच्या निवासस्थानी चित्रित करण्यात आला असून व्हिडिओ शूट करणारा कॅमेरामनही पीएमओ कार्यालयातील कर्मचारी होता’,अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. या व्हिडिओवर एक रुपया देखील खर्च झालेला नाही, असे पीएमओने स्पष्ट केले.