मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राहुल गांधींची पीएम मोदींना झप्पी

तेलगू देसम पक्षानं प्रस्तावित केलेला अविश्वासाच्या ठरावावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी आपलं भाषण संपवल्यावर पीएम मोदी यांना जादूची झप्पी दिली. मोदींनी राहुल यांच्याशी हात मिळवला. राहुल गांधींनी भाषण संपवून पीएम यांना आलिंगन दिलं.
 
राहुल गांधी यांनी म्हटले की मी पीएम मोदींचा आभारी आहे की त्यांनी मला आपलं धर्म काय हे समजवले आणि हिंदू असल्याचा अर्थ समजवला. आपल्या मनात माझ्यासाठी वैर, राग आहे, आपण मला पप्पू ही हाक मारु शकता परंतू माझ्या मनात आपल्यासाठी राग नाही. मी एक-एक करुन आपल्या सर्वांच्या मनातील राग बाहेर काढेन आणि सर्वांना काँग्रेस पक्षात सामील करेन.
 
राहुल म्हणाले की मी पंतप्रधानांचे आभरी आहे की त्यांनी मला काँग्रेसचा अर्थ समजावला, भारतीय असल्याचा अर्थ समजावला.