बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची घेतली शपथ

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 
या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींसोबत खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
मोदी यांच्या आणि नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. 
 
शपथविधी आधी मोदींनी शहिदांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळालाही अभिवादन केले.