गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2017 (21:20 IST)

पोलीस भरती उंची वाढवून सांगण्यासाठी टोपचा वापर, उमेदवार बाद

police bharti
नाशिक शहरात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. यात शनिवारी चौथ्या दिवशी त्र्यंबकेश्वरतून पोलीस भरतीसाठी आलेल्या राहुल किसन पाटील या तरुणाने आपली कमी असलेली उंची वाढवून सांगण्यासाठी टोपचा वापर केला. केसांवर टोप चढवल्याने त्याची आवश्यक असलेली १६५ इंचाहून जास्त उंची भरली होती. मात्र तेथील एका चाणाक्ष कॉन्स्टेबला याबाबत  संशय आला. त्यानंतर पाटीलची तपासणी करण्यात आली. त्यात त्याने


केसांवर टोप घातलेला आढळून आला. या टोप मध्ये त्याने आतमधून केस चिकटवले होते. जेणेकरून त्याची उंची नियमात बसावी. मात्र त्याचा हा खोटेपणा पकडला गेल्यामुळे त्याला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुलवर काय कारवाई करण्यात येईल अशी माहिती भरतीवर लक्ष ठेवून असलेल्या परिमंडळ २ चे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.