रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारत करतोय गरिबी करण्यासाठी प्रयत्न

देशातील नागरिकांनमधील गरिबी कमी करण्यासाठी महत्तवपूर्ण प्रयत्न करणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचाही सहभाग असून, मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स २०१९ (MPI) च्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली. देशातील झारखंड सर्वात गरिब राज्य असून वेगाने तेथील गरिबी वेगाने कमी होत आहे. ऑक्सफोर्ड पॉवर्टी अॅण्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यांनी मिळून हा रिपोर्ट तयार  केला आहे. रिपोर्टनुसार, २००५-०६ ते २०१५-१६ दरम्यान २७.१ कोटींना दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. यामध्ये झारखंड राज्यात सर्वात वेगाने गरिबी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
 
गरिबी कमी करण्यासाठी मुख्यत्वे १० मुख्य मुद्द्यांचा विचार करण्यात आला. यामध्ये संपत्ती, स्वयंपाक इंधन, स्वच्छता आणि पोषण यांचा समावेश होतो. एमपीआयमध्ये १०१ देशांमधील आरोग्य, शिक्षण, जीवनाचा स्तर मुख्यत्वे लक्षात घेतला होता.रिपोर्टनुसार, भारताने आपल्या येथील गरिबी ५५.१ टक्क्यांवरुन खाली आणत २७.९ टक्के म्हणजे जवळपास अर्ध्यावर आणली आहे. भारताने जवळपास २७.१ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. याआधी गरिब लोकांची संख्या ६४ कोटी होती, जी आता ३६.९ कोटींवर आली आहे.