उत्तर प्रदेशात जालौनमध्ये गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण
उत्तरप्रदेशातील जालौन मधून एका गर्भवती महिलेला काही स्थानिक गुंडानी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकांची माहिती न दिल्याने तरुण आणि त्याच्या पत्नीला गुंडांनी बेदम मारहाण केली.संदीप आणि उपासना असे या पीडित पती पत्नीची नावे आहेत.
"आरोपी रवींद्र, मनमोहन आणि मनमोहनचा मुलगा आदेश यांनी तरुणाच्या घरी पोहोचल्यावर त्यांच्या काकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संदीपने विरोध केला तेव्हा आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरू केली. संदीपची पत्नी उपासना हिने मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने तिच्यावर हल्ला केला.
"आठ महिन्यांच्या गरोदर असलेल्या उपासनाने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी तिला मारहाण केली ज्यामुळे ती बेशुद्ध झाली.नवऱ्याने आरडाओरड केल्यावर शेजाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. शेजाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला आणि इंटरनेटवर शेअर केला. जालौनचे पोलिस उपअधीक्षक (एसपी) शैलेंद्र बाजपेयी म्हणाले, "आरोपींनी तक्रार दाखल केली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांनी घटनेतील दोषींवर कारवाई सुरू केली आहे." पुढील तपशील सुरु आहे.
Edited By - Priya Dixit