मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (17:15 IST)

सीबीएसई बारावीच्या परीक्षेसंदर्भात पंतप्रधान मोदींची मोठी बैठक

नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण सभेच्या अध्यक्षस्थानी असतील. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,या बैठकीत त्यांना सर्व संभाव्य पर्यायांची माहिती दिली जाईल, जे विविध राज्ये व अन्य भागधारकांशी व्यापक सल्ला मसलतानंतर पुढे आले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने कोरोना व्हायरस साथीचा रोग सर्व देशभरात पसरल्यामुळे दहावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्याची व बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शिक्षण मंत्रालयाने राज्यांसह विविध भागधारकांशी विस्तृत चर्चा केली.
 
या बैठकीत केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयल निशंक, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी आदींनी भाग घेतला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परीक्षेसंदर्भात विविध राज्ये व अन्य भागधारकांकडून सूचना मागविल्या होत्या. 3 जूनपर्यंत या संदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याचे सरकारने सर्वोच्च न्यायालयात कळविले आहे. सर्वोच्च न्यायालय या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करीत आहे.