गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (13:22 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन यांची प्रकृती खालावली, अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल

Prime Minister Narendra Modi's mother Heeraben  admitted to hospital in Ahmedabad National News In Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हीराबेन यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. या वर्षी जूनमध्ये त्यांनी 100 वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर पीएम मोदींनी त्यांचे पाय धुतले आणि आशीर्वाद घेतले. नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदींनी हीराबेन यांची भेट घेतली होती. अहमदाबाद विमानतळावरून उतरल्यानंतर ते थेट गांधीनगरला त्यांची आई हीराबेन मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मोदींनी जवळपास 45 मिनिटे आईच्या घरी घालवले. हिराबेन यांना नेमके काय  झाले  या बाबत  अद्याप समजू शकले नाही . 
Edited By - Priya Dixit