रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (23:54 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक, जाणून घेणार कोरोनाबाबत राज्यांची स्थिती

देशातील कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे चिंतेचा विषय आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची ही बैठक दुपारी 4.30 वाजता होणार आहे. 
 
या बैठकीत पंतप्रधान मोदी कोरोनाच्या परिस्थितीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना साथीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. आढावा बैठकीत पीएम मोदींनी ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे वाढत्या कोविड प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर तयारीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. याशिवाय पीएम मोदींनी आरोग्याच्या पायाभूत सुविधांबाबत सुरू असलेल्या तयारींवर भर दिला.
 
देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,94,720 नवीन प्रकरणे आल्यानंतर, एकूण संक्रमित लोकांची संख्या 3,60,70,510 झाली आहे, त्यापैकी 4,868 प्रकरणे ओमिक्रॉन प्रकारातील आहेत. बुधवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 9,55,319 वर पोहोचली आहे, जी गेल्या 211 दिवसांतील सर्वाधिक आहे. तसेच, आणखी 442 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोविड-19 मुळे मृतांचा आकडा 4,84,655 वर पोहोचला आहे.
ओमिक्रॉनच्या एकूण 4,868 प्रकरणांपैकी, 1,805 लोक आतापर्यंत बरे झाले आहेत किंवा देशाबाहेर स्थलांतरित झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 1,281 प्रकरणे आहेत. यानंतर राजस्थानमध्ये 645, दिल्लीत 546, कर्नाटकात 479 आणि केरळमध्ये 350 रुग्ण आढळले आहेत.