मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (14:07 IST)

अरे देवा भोंदू राधे मां पोलिसांच्या खुर्चीत

/radhe-ma-welcomed-at-vivek-vihar-police-station-in-delhi-sat-on-chair-of-sho

आपल्या देशातील साधू आराखडा परिषदेने ज्या लोकांना भोंदू ठरवले त्या पैकी राधे माच्या  प्रभावात दिल्लीत एक भयानक गोष्ट घडली आहे. यामध्ये दोन वेगवेगळया प्रकरणात आरोपी असलेली स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ ला दिल्ली पोलिसांनी स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचे आता दिसून आले आझे. यामध्ये चोकशी साठी आलेल्या आणि  हुंडयासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे माँ ची दिल्लीच्या विवेक विहार पोलीस स्टेशनमध्ये शाही बडदास्त तर ठेवलीच होती. त्या सोबत  विवेक विहार पोलीस स्थानकाचे स्टेशन हाऊस अधिकारी यांनी चक्क आपली खुर्ची राधे माँ ला बसण्यासाठी दिली आहे. या भिकार माँ चा दरबार भरतो तेव्हा तिचे भक्तगण लाल चुनरी गळयात घालतात असे हे पोलीस  फिरत होते. जसे की भक्त आहेत. यामध्ये  पूर्व दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये फुल उधळून राधे माँ चे स्वागत करण्यात आले आहे. राधे माँ पोलीस स्टेशनमध्ये एसएचओ अधिका-याच्या खुर्चीवर बसली आहे आणि अधिकारी हात जोडून तिच्या शेजारी उभा आहे असे चित्र फोटो आणि व्हायरल व्हिडीयो मध्ये दिसत आहेत.