रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (09:26 IST)

नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिलेला शब्द पाळला

माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमृतसरमधील पीडित शेतकऱ्यांना  मदत करत स्वतःच्या खिशातून १५ लाख रुपये दिले आहेत. असे करून त्यांनी आपला शब्द पाळला आहे. 

यावर्षी एप्रिल महिन्यात अमृतसरमधील २०२ एकर एवढ्या मोठ्या शेतातील उभे पीक शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यावेळी पीडित शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई म्हणून जेवढी रक्कम देईल, तेवढीच रक्कम मी स्वतःच्या खिशातून देईल, असे सिद्धूने म्हटले होते. त्यांनी आपला हाच शब्द पाळला आणि शेतकऱ्यांना धनादेशाच्या स्वरुपात मदत देऊ केली आहे.