मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 9 एप्रिल 2018 (17:12 IST)

'हा' फोटो तर सोमवारी सकाळी ८ वाजताचा

rahul gandhi congress
एकीकडे सोमवारी काँग्रेसतर्फे देशव्यापी  उपोषण सुरू असतांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतः राजघाटावर उपवासाला बसले आहेत. पण, याच दरम्यान एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत काँग्रेस नेते अजय माकन, हारुन युसुफ, अरविंदर सिंह लवली हे छोले भटुरे खात आहेत. लवली यांनी हा फोटो खरा असल्याचंही सांगितल्याचं समोर येत आहे.   
 
भाजप नेते हरीश खुराना यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. काँग्रेस नेत्यांनी लोकांना राजघाटावर उपोषणासाठी बोलावलं आहे पण स्वतः मात्र हॉटेलमध्ये बसून छोले भटुऱ्यांवर ताव मारत आहेत, अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोमध्ये असलेले काँग्रेस नेता अरविंद सिंह लवली यांनी हा फोटो खरा असल्याचं स्वीकारलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा फोटो सोमवारी सकाळी ८ वाजताचा असल्याचं लवली यांचं म्हणणं आहे. तसंच, आमचं उपोषण साडे दहानंतर सुरू होणार होतं, त्यामुळे या फोटोत काहीही वावगं नाही, असंही लवली म्हणाले आहेत.