मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काँग्रेसची धुरा आता राहुल यांच्या हातात

राहुल गांधी शनिवारी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा संभाळली. राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले. सोनिया गांधी ने अक्ष्यक्ष म्हणून आपले शेवटले भावुक संबोधन देत राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या.
 
दिल्लीत आयोजित या राज्यभिषकाच्या या भव्य कार्यक्रमात देशभरातील काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले. मोठेमोठे बॅनर्स लावून, फटाखे फोडून आणि कार्यकर्त्याद्वारे सांस्कृतिक नृत्य प्रदर्शन करुन खुशी जाहिर करण्यात आली.
 
राहुल गांधी द्वारे अध्यक्षपदाचा पदभार स्विकार केल्याने काँग्रेसच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. सलग 19 वर्ष पक्षाचं नेतृत्व करत अध्यक्षपद सांभाळणार्‍या सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी वगळता इतर कुणीही अर्ज न केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातून आलेले काँग्रेसचे सहावे अध्यक्ष आहेत.