शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतात बरोजगारीची मोठी समस्या: राहुल गांधी

भारतात असहिष्णुता व बेरोजगारी या दोन मोठ्या समस्या आहेत व त्यांनी देशाची सुरक्षा व प्रगतीसमोर आव्हान उभे केले आहे, असा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केला. सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.
 
दोन आठवड्यांच्या अमेरिका दौर्‍यावर असणार्‍या राहुल यांनी अनेक संस्थांच्या प्रतिनिधींशी बैठका घेतल्या. भारतात असहिष्णुता व बेरोजगारी या दोन मोठ्या समस्या आहेत. या समस्यांचे आव्हान मोठे आहे. पुरेशा रोजगारांची निर्मिती करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने देश बिकट स्थितीतून जात आहे, असा आरोप त्यांनी केला. राहुल यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या संपादकीय मंडळाशीही चर्चा केल्याचे समजते.