सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 मार्च 2018 (15:05 IST)

प्रवाशांचा गैरवर्तनामुळे रेल्वेने एलसीडी काढले

रेल्वे प्रशासनाकडून तेजस एक्स्प्रेस आणि शताब्दीच्या कोचमधील सगळे एलसीडी काढून टाकण्यात येणार आहेत. प्रवाशांकडून एलसीडीच्या वायर तोडण्यात आल्या असून स्क्रीन खराब करण्यात आले आहेत. तसेच यासोबत लावलेल्या हेडफोन्सची चोरी करण्यात आल्याने ही सुविधा काढून टाकण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.  

तेजसमध्ये ९९० सीट्स असून १३ पॅसेंजर कोचेस आहेत. यामध्ये एक्झिक्युटिव्ह कोचचादेखील समावेश आहे. प्रत्येक सीटसाठी मनोरंजनाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये चित्रपट, गाणी, एफएम चॅनेल्स आणि गेम्सचा समावेश आहे. यासोबतच रेल्वेने ब्रँडेड हेडफोनदेखील उपलब्ध करुन दिले होते. पहिल्या चार फेऱ्यांआधी रेल्वेने दिलेले बहुतांश हेडफोन्स प्रवाशांनी परत केले नाहीत. यासोबतच प्रवाशांनी इन्फोटेनमेंट स्क्रिनचीदेखील मोडतोड केली. सुरुवातीला देण्यात आलेले हेडफोन्स हे २०० रुपयांचे होते, मात्र त्यांची चोरी झाल्याने तसेच मोडतोड झाल्याने त्याऐवजी ३० रुपयांचे साध्या गुणवत्तेचे हेडफोन्स देण्यात आले होते. परंतु आता तेही काढण्यात येणार आहेत. या दोन्ही रेल्वेतील मनोरंजनाची साधने काढण्यात येणार असली तरीही प्रवाशांना हॉटस्पॉट आणि वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहे.