गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (17:29 IST)

देशात एकूण 23 रेल्वे स्थानकांचा विकास होणार, यात राज्यातील ६ स्थानके

सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीच्या माध्यमातून देशभरातील एकूण 23 रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या कार्यक्रमाची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल भवन येथे केली. यामध्ये बॉम्बे सेंट्रल (बीसीटी), लोकमान्य टिळक टर्मिन्सल (एलटीटी), पुणे जनंक्‍शन, ठाणे, बांद्रा टर्मिन्लस, बोरीवली, या सहा रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
 
या रेल्वे स्थानकांच्या फेरविकासाकरिता खुल्या निविदा मागवण्यात येणार आहेत. यामध्ये ए 1′ तथा ए’ श्रेणीच्या रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने महानगरे, प्रमुख शहरे, स्मार्ट सिटी, अमृत या योजनेत सामील होणारी शहरे, तसेच पर्यटन आणि धार्मिक ठिकाणांवरील शहरांचा यात समावेश आहे. या अतंर्गत रेल्वेकडून अधिकाधिक 140 एकर जमीन ही 45 वर्षाकरिता विकासकांना लीजवर देण्यात येईल. यासाठी रेल्वेने झोननुसार नोडल अधिकाऱ्यांची नेमणुक केली आहे. जे विकासकांसोबत चर्चा करतील. या रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास लीलावाव्दारे (बीडीव्दारे) निश्‍चित केला जाणार आहे. या प्रथम टप्प्यातील रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासासाठी जवळपास 6000 ते 9000 कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याचे बोस्टन कन्सल्टंट ग्रुपने सांगितले आहे.