शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :लखनौ , रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (21:31 IST)

मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राज बब्बरला दोन वर्षांची शिक्षा

येथील एका खासदार/आमदार न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना 1996 च्या निवडणुकीत मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. राज बब्बर यांना सरकारी कामात अडथळा आणणे आणि इतर तीन गुन्ह्यांसाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2 मे 1996 रोजी निवडणुकीदरम्यान बब्बर यांच्या विरोधात मतदान अधिकाऱ्याने येथील वजीरगंज पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. त्यावेळी राज बब्बर हे समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत होते.
 
कोर्टाने त्याला सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरवले आणि 8,500 रुपयांचा दंडही ठोठावला. निकाल सुनावण्यात आला तेव्हा राज बब्बर न्यायालयात उपस्थित होते.