1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 मे 2023 (16:46 IST)

Rajasthan: लग्न करण्याआधी वराने मागवली बोलेरो, वधू पक्षा कडून मारहाण

देशात हुंडा घेणं आणि देणं हे दोन्ही अपराध आहे. तरीही आज देखील देशात काही भागात हुंडा देणं आणि घेणं सुरूच आहे. आज देखील किती गावात हुंड्यामुळे वरपक्ष लग्न मोडतात. असेच राजस्थानच्या दौसा येथे एका नवरदेवाला हुंड्यात बोलेरो गाडी मागणं चांगलंच भोवले आहे. नवरदेवाने लग्नापूर्वी बोलेरो मागितली तर वधूकडील मंडळीने नवरदेवाला चांगलंच धुवून काढलं नवरदेव आणि त्याच्या काकाला बांधून ठेवलं पोलिसांनी मंडपात येऊन मध्यस्थी करत दोन्ही कडील मंडळींची समजूत काढून प्रकरण शांत केले. 
 
दौसाच्या मंडपात आलेल्या वराला हुंड्यात बोलेरो मागणे महागात पडले. वधू पक्षाने नवरदेवाला जोरदार मारहाण केली, त्याचे  कपडेही फाडले. प्रकरण इथेच थांबले नाही. वराच्या काकांनाही पकडून बेदम मारहाण करण्यात आली. हळूहळू वाद वाढत गेला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून मिरवणुकीत पळापळ झाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत घालून प्रकरण शांत केले.

नागलगावच्या लखन मीना यांची मुलगी निशा (24) हिचा विवाह दौसातील बेजूपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील झुटाहेडा येथील विजेंद्र (28) मीना याच्याशी होणार होता. दोन्ही गावांचे अंतर सुमारे 11 किलोमीटर आहे. विजेंद्रचे कुटुंबीय सोमवारी सायंकाळी सात वाजता मिरवणूक घेऊन नांगल गावात पोहोचले. गावात पहिली मिरवणूक काढण्यात आली. रात्री नऊ वाजता हे लग्न लागणार होते.  आणि त्यासाठी वधू पक्षाच्या लोकांनी पूर्ण तयारी केली होती.
 
वराने मंडपात पैशांसह बोलेरोची मागणी केली आणि दोघांना भेटल्यानंतरच लग्न लावू , असे सांगितले. यावरून दोन्ही बाजूंनी तणाव निर्माण झाला होता. हे प्रकरण इतके वाढले की वधूच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी वर विजेंदर आणि त्याचा काका पप्पुलाल मीणा यांना बेदम मारहाण केली.कपडे फाडले. दोन्ही बाजूचे लोक समोरासमोर आले. बिघडलेले वातावरण पाहून वऱ्हाडीने लग्नाच्या मंडपातून  घटनास्थळावरून पळ काढला. 
 
विजेंदरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली.पोलिसांसह पुन्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना कळले की वधूच्या बाजूच्या लोकांनी काका आणि पुतण्या दोघांनाही ओलीस ठेवले. पोलिसांनी दोघांनाही सोडून दिले.वराचे वडील कैलाश दिल्लीत सरकारी नोकरी करतात. मुलगा विजेंदर वडिलांसोबत राहतो. मुलाच्या लग्नासाठीच हे कुटुंब त्यांच्या गावी आले होते. मुलगा आणि मुलगी दोघेही बीए पास आहेत.
 
 
 
Edited By - Priya Dixit