बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (11:07 IST)

३१ डिसेंबरला रजनीकांत राजकीय वाटचालीची घोषणा करणार

सुपरस्टार रजनीकांत ३१  डिसेंबर रोजी आपल्या राजकीय वाटचालीची घोषणा करणार असल्याची माहिती त्यांनी चेन्नई येथे चाहत्यांशी बोलताना दिली. येत्या ३१ डिसेंबर पर्यंत रजनीकांत राज्यातील आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतरच रजनीकांत त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयीची घोषणा करतील. त्यानंतर मात्र, त्यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी कोणतिही शंका उरणार नाही. 
 

सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. पण, गेल्या काही महिन्यांत विशेषतः माजी मुख्यमंत्री जयललीता यांच्या निधनानंतर रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी जास्त चर्चा सुरू झाली. या चर्चांना आता पूर्ण विराम मिळणार आहे.