मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016 (17:27 IST)

अभिनेता राजपाल यादवची राजकारणात एंट्री

rajpal yadv
अभिनेता राजपाल यादवने आता राजकारणात एंट्री केली आहे. त्याने नवीन पक्ष स्थापन  केला आहे. सर्व समभाव पार्टी (एसएसपी) असे पक्षाचे नाव आहे. पक्ष आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचीही राजपाल यादवने माहिती दिली आहे.

यावेळी वाद नव्हे तर संवादाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात येत आहे  असे राजपाल यादवने सांगितले. आम्हाला मेट्रो पाहिजे  पण सोबतच शेतकऱ्यांच्या ऊसाचा पैसा द्यावा, आम्हाला एक्स्प्रेस महामार्ग पाहिजे, पण त्याआधी गावांमध्ये रस्ता पोहचला पाहिजे असे मत राजपाल यादवने व्यक्त केले आहे.