रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:37 IST)

गुजरात राज्यसभेच्या 3 तर बंगालच्या 6 जागांसाठी मतदान सुरु

गुजरात राज्यसभेच्या 3 जागांसाठी तर पश्चिम बंगालच्या 6 जागांसाठी आज मतदान सुरु आहे. सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होईल. तर 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि संध्याकाळी सात वाजता निकाल जाहीर करण्यात येईल. सर्व 9 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 18 ऑगस्टला संपणार आहे.

गुजरातमध्ये होत असलेल्या राज्यसभेच्या 3 जागांसाठी भाजपकडून भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेस सोडून आलेले बलवंत सिंह निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर काँग्रेसकडून अहमद पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गुजरात विधानसभेत एकूण 182 आमदार आहेत. काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता केवळ 176 आमदार उरले आहेत. मात्र भाजपने इतर आमदारांच्या पाठिंब्याने बलवंत सिंह यांच्या विजयाचा दावा केला आहे. काँग्रेसकडे सध्या असलेल्या 51 आमदारांच्या पाठिंब्यावर अहमद पटेल यांचा विजय निश्चित पाहिजे, मात्र काँग्रेसच्या गोटात सध्या अस्वस्थता आहे. कारण बंगळुरुमध्ये ठेवलेल्या 44 आमदारांचाच पक्षाला पाठिंबा असल्याची माहिती आहे.