शुक्रवार, 1 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (12:35 IST)

जौनपूरमध्ये आरतीच्या वेळी भगवान शिवाची भूमिका साकारणाऱ्या राम प्रसाद यांचे निधन

जौनपूरच्या मच्छलीशहरमध्ये रामलीलादरम्यान भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राम प्रसाद उर्फ ​​चब्बन पांडे (50) असे या मृतक व्यक्तीचे नाव आहे.रामलीलेत भगवान शिवाची भूमिका साकारत होते. आरती सुरु असताना सोमवारी बेलसीन गावात राम प्रसाद यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचा छातीत कळ येऊन ते खाली कोसळले . त्यांना तातडीनं जवळच्या वैद्यकीय केंद्रात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यू नंतर रामलीला थांबविण्यात आली. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. 
Edited By - Priya Dixit