गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

रामदेव बाबांना पाकमध्ये साजरा करायचा योग दिवस

अहमदाबाद- 21 जून रोजी येणारा आंतरराष्ट्रीय ‍योग दिवस पाकिस्तानात जाऊन साजरा करण्याची मनीषा योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केली आहे.
 
रामदेव बाबा यांना पाकिस्तानातील योग कार्यक्रम राबवायचा आहे, त्यासाठी त्यांनी पाकिस्तानात जाण्याची तयारीही दर्शवली आहे. 
 
पाककडून मला योगा शिकवण्यासाठी निमंत्रण आले आहे. पाकमधला प्रत्येक व्यक्ती हा दहशतवादी नाही. शेजारील देशांनाही योगा शिकवण्याची गरज आहे. मात्र मला पाकिस्तानातल्या राजकीय अस्थिरतेची चिंता आहे. तरीही मी पाक जाणार आहे, असेही रामदेव बांबानी सांगितले आहे. चार दिवसांच्या योग शिबिराला सुरूवात झाली असून त्यानिमित्त ते गुजरातमध्ये बोलत होते.
 
पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही ते म्हणाले.