1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (11:37 IST)

भारतात 'येथे' आढळला दुर्मिळ पांढरा हरीण

सध्या पांढऱ्या रंगाच्या दुर्मिळ हरिणाची चर्चा होत आहे. दुर्मिळ प्राणी पाहणे नेहमीच रोमांचक आहे. नुकतीच अशीच एक घटना आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात घडली. जेव्हा तिथल्या जंगलात एक दुर्मिळ पांढऱ्या हॉग हरिण फिरताना आढळला . याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे, ज्याने युजर्सला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात असंख्य वनस्पती आणि प्राणी आहेत.  उद्यानातील कोहोरा परिसरात 'अल्बिनो हॉग डीअर' दिसले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, पांढरे हॉग हरिण एका तपकिरी हरणाचा पाठलाग करताना सावकाशपणे चालताना दिसत आहे.
इतर हरणांसोबत पांढऱ्या हॉग डियरही जंगलात फिरताना आणि गवताचा वास घेताना दिसत आहे . हरणाचा पांढरा रंग असणे दुर्मिळ आहे, ज्याने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. दरम्यान, पार्श्वभूमीत पक्ष्यांचा किलबिलाट आवाज आल्हादायक वाटत आहे. 
हा व्हिडिओ 16 डिसेंबर रोजी काझीरंगा नॅशनल पार्क आणि रिझर्व्हने ट्विटरवर पोस्ट केला होता. सोशल मीडियावर आल्यानंतर त्याला खूप पसंती दिली जात आहे. हा व्हिडिओ 14 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.