पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त दुपारी 1.30 पर्यंत लसीकरणाचा विक्रम
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आजचा दिवस 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्याची भाजपची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. भाजपने एक कोटी लसीकरणाचे लक्ष्य ठेवले होते, परंतु दुपारी 1 पर्यंत एक कोटीहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. देशाच्या विविध भागांमध्ये भाजप नेते आणि कार्यकर्त्यांद्वारे बूथ स्तरावर लसीकरण मोहिमा राबविल्या जात आहेत. या भागात आतापर्यंत 1 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. शुक्रवारी एक लाखांहून अधिक ठिकाणी लस दिली जात आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात 21 जून रोजी 88.09 लाख आणि 27 ऑगस्ट रोजी 1.03 कोटी विक्रमी लसीकरणाचा पल्ला गाठण्यात आला होता. आता पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी 20 दिवसांचा मेगा इव्हेंटही आयोजित करत आहे. या कार्यक्रमाला सेवा आणि समर्पण अभियान असे नाव देण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेली ही मोहीम 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.