मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 जुलै 2021 (13:43 IST)

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा मतमोजणी करा, 8 भाजप नेते कोलकाता हायकोर्टात

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुन्हा मोजणी करावी, या मागणीसह भाजपच्या आठ नेत्यांनी कोलकाता हायकोर्टाचे दार ठोठावले आहेत.
 
या मागणीच्या याचिकेवर कोलकाता हायकोर्टात सोमवारी (5 जुलै) सुनावणी होणार आहे.
 
विधानसभा निवडणुकीत मनिकटोला इथून पराभूत झालेले कल्याण चौबे यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केलीय,.
 
ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्यासाठी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भाजपनंही हायकोर्टाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला. नंदिग्राममधून ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्या तिथून पराभूत झाल्या